स्वप्न
स्वप्न

1 min

251
रात्रीच्या गाढ झोपेत
पाहावं उद्याचं स्वप्न
पूर्ण ते करण्यात
होऊन जावं मग्न
उराशी बाळगलेले स्वप्न
असते मोठे रहस्य
साकार होता
चेहऱ्यावर येते हास्य
नवीन आकांक्षाचे
स्वप्न देते बळ
अन् मेहनत देते
स्वप्नपूर्तीचे फळ
स्वप्न उज्वल भविष्याचे
स्वप्न स्वतःला सिद्ध करण्याचे
स्वप्न देशासाठी झुरण्याचे
स्वप्न नव्याने जगण्याचे