स्वच्छंदी मन
स्वच्छंदी मन


विचाराचं जाळं
अदृश्य रूप
मनावाचून अडे
आपलं खूप
मनात चाली
कुठला खेळ
ओळखताना घालावा
लागी मेळ
चंचल कोमल
मृदु हळवे
सहन नाही
होत हेवेदावे
कधी होई
सुन्न दुःखी
मधेच होई
आनंदी सुखी
स्वच्छंदी बने
फिरायला आवडे
पाखरू बनून
वाऱ्यासंगे उडे