सुट्टीची धमाल ( बालकविता )
सुट्टीची धमाल ( बालकविता )
1 min
7.4K
झाली वार्षीक परीक्षा
तुझे काही ऐकणार नाही
अभ्यासाला बस आता
अजिबात म्हणायचे नाही...
दे तुझा मोबाईल
गेम खूप खेळणार
रिमोट वर माझी सत्ता
फक्त कार्टूनच लावणार...
उन्हाळी शिबीराला
मी नाही जाणार
घरात दंगा मस्ती
तुमच्या सोबत राहणार....
उन्हात खेळताना
उगाच नाही ओरडायचे
मीच येईल घरात
तू नाही बोलवायचे...
सुट्टीची धमाल अशी
तुम्ही मला करू दयाना
माझ्या सोबत आई-बाबा
तुम्हाही लहान व्हाना.....