STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

सुखी रहा पोरी .

सुखी रहा पोरी .

1 min
28.2K


सनई चौघड्याच्या सुरात , लगीनघाई जोरात 

लेक लाडकी झाली सून त्या घरची काही क्षणात 

माता- पित्याचे नाव- गाव सर्व त्यागुनी ...

अनोळखी सारे, सर्वस्व मानुनी ती निघाली ...


वडिलांचा करारी बाणा , तो बोलका वाडा 

आईची वेडी माया , राजस भाऊराया ... 

बालपणीच्या मैत्रिणी , सख्या शेजरींनी 

निरोप तीज द्यावया सिद्ध झाला ... 



तीच मौन ही खूप काही सांगून गेलं न बोलताही 

डोळ्यांनीच बघ कसा वार्तालाप केला सगळ्यांशी ...

चेहरा तुझा केविलवाणा ,कंठ दाटून आलेला ...

अश्रुनी भिजली होती काया, आईचाही पदर ओला ..


थिजले होते शब्द तुझे ओठांवरती तसेच.

ओठांनीही सोडले होती साथ तुझी केव्हाच ... 

डोळे मात्र बरंच काही सांगत होते न चुकता 

ज्या अंगणी हसलो-खेळलो, बागडलो न थकता 



ती निघाली जड पावलांनी ,थोरा मोठाच्या पडुन पाया

घेऊन गाठीशी आठवणींची शिदोरी , सासुरवाशीण व्हावया.. 

गहिवरला मंडप सारा ..अश्रुनी भिजल्या काया...पाठवणीची घटका आली   

सुखी रहा पोरी , कर उज्वल नाव दोन्ही घराण्याचं ,नांदा सौख्यभरे ...


Rate this content
Log in