स्टेथोस्कोप
स्टेथोस्कोप
1 min
12K
सर्दी ताप
कणकण झाली
दवाखाण्याच्या दिशेने
पायपीट केली
डॉक्टरांनी काय
होतंय विचारले
क्षणात पेनाने सारे
कागदावर उतरवले
स्टेथोस्कोपची किमया
अगदी न्यारी
निदानाची झाली
तयारी सारी
औषध गोळ्या
दिल्या मग त्यांनी
बरे वाटले मला
दोन दिवसांनी