सत्संग
सत्संग
1 min
12.1K
परमेश भक्ती / आनंदे करावी
साधना करावी / ईश्वराची
नाम जप तप / नित्य आचरावे
सत्संग जोडावे / नित्यनेमे
मनाची बैठक / पूर्ण साधनेने
मनोबल वाढे / परिपूर्ण
नको मोह मनी / माया प्रपंचाचा
नामस्मरणाचा / जप करी
एकाग्र करावे / मन हे चंचल
सत्संग देईल / मनःशांती
भक्ती मनी ध्यानी / सदा सुविचार
तैसाचि आचार / कर्मामधे
हरी मुखे बोल / पवित्र वागावे
भक्तिमार्गे जावे / जीवनात
सत्य वदे वाचे / शुध्द आचरण
तमोगुण तण / उपटावे
साधना सन्मार्ग / नित्य सत्संगाने
जीवन सार्थकी / परमार्थे