STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

स्त्रीत्वाच्या वेदना

स्त्रीत्वाच्या वेदना

1 min
13.4K


वंश वाढवण्या

दोष देती तीला

देत असे त्रास

स्त्रीच एका स्त्रीला....१

चोवीस तास ती

असे कामगार

तीने सांभाळावे

सदा घरदार....२

रांधा, वाढा, काढा

खरकटी उष्टी

हसरा चेहरा

असे जरी कष्टी....३

बाहेरचे सारे

सांभाळावे तीने

तरी दिसतेच

तिच्यातच उणे....४

तिच्या साठी नसे

कोणा संवेदना !

समजाव्या आता

स्त्रीत्वाच्या वेदना !!...५


Rate this content
Log in