STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

स्त्रीत्व हाच गुन्हा

स्त्रीत्व हाच गुन्हा

1 min
52

काव्यप्रकार अष्टाक्षरी


अनंतशा कालौघात

तिचं दुःख वाहतंय

कधी थोडं सुकतंय

कधी भळभळतंय  (1)


पैसे, फ्लॅट, सोनं-नाणं

अरेरावी मागणीची

काय करावं उमजेना

मनी धास्ती अखंडचि  (2)


गुंड, मवाली, रोमिओ

एकतर्फी प्रेम करी

प्रतिसाद नाकारता 

आम्ल फेके तोंडावरी  (3)


मिळवती असूनही

हुकमत तिच्यावर 

काही विरुद्ध बोलता

हात टाकी तिच्यावर  (4)


माझं स्त्रीत्व हाच गुन्हा?

कधी खरी समानता?

मनी विचारांचा गुंता

कुणी उत्तर सांगता? (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy