स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
कधी अबोल, तर कधी बडबडणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
कधी बापाची लाडकी राजस लेक
माहेरी काहीच काम न करणारी
उंबरठा ओलांडताच सासरचा
अचानक जबाबदारीने वागणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
माहेरी उगाचच लटके रूसून बसणारी
सासरी बोचरे शब्दबाणही पचवणारी
आई-बाबांशी बोलताना मात्र
हास्यामागे अश्रूंचा सागर लपवणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
आजारी असली तरीही काम करणारी
संसारात तीव्र चटक्यांकडे दुर्लक्ष करणारी
नाती सासरची सारी सांभाळणारी
तरीही सासरच्यांसाठी परकीच असणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
तिलाही हवी असते अशी साथ
तिचे दुःख समजून घेणारी
तनामनांच्या खोल जखमांवर
मायेने हळुवार फुंकर घालणारी
पण तिची व्यथा आहे कोणालाही न कळणारी