सरेल कोरोनाचे पर्व !!
सरेल कोरोनाचे पर्व !!
1 min
245
तुटेल कोरोनाचे जाळे,
संपेल कोरोनाचे पर्व
आपण पुन्हा घेवू सर्व
छान श्वास ते मोकळे !!
सर्व नियम पालन करा
थोडे दिवस संयम हवा,
वारंवार हात तूम्ही धुवा
पण मास्क लावून फिरा !!
अंतर ठेवूनच बोला
शरीर संपर्क ही टाळा
हात मिळवणी कशाला
लांबून नमस्कारच भला !!
बाहेर फिरू नका कोठे
ठेवा सुरक्षित स्वतःला
संकट उभे आहे मोठे
समाजाला ही सांभाळा !!
पहा लवकरच अगदी
होईल पूर्वी सारखं सर्व
जग ऊत्साही आनंदी
सरेल कोरोनाचे हे पर्व !!
मग गुढी उभारू आपली
तोडून कोरोनाची साखळी !!