सोन्याने मढवायला
सोन्याने मढवायला
1 min
936
नविन आलेल्या नवरीने
घरात पाउल ठेवलं
कपाटांत नुसतीचं
पुस्तके पाहुन मन तीच आटलं
कुरबुर करत
आकांड तांडव करत कांगावा केला
सिनेमाचा पहिलाचं
शो पाहायची अभिरुचीच नाही
रात्री जेवण झाल्यावर
नाक्यावरच्या पानटपरीवर
पान खात
शतपावली करण्याची सवयंच नाही
सोन नाणं नाही
चांगले शिक्षण-संस्कार आहे म्हणे
नुसतंच मोठ नावं घेवुन
मीरवु कशी ग मी गडे
अन् एके दिवशी
घरातला कच्चा धाग्याला
कपटाने हात धरुन
सोन्याने मढवायला घरा बाहेर पडली
