सोड तू बंदिस्त धुसमट
सोड तू बंदिस्त धुसमट
सोड तू बंदिस्त घुसमट
तोड ऐकदा पिजंरा
तुझेच जीवन सुंदर व्हावे
रे जिवंत पाखरा
गुहेत आहे तेच ते
बंदिस्त नात्याचे ओझे
कुठवर वाहत नेशील
ह्रदयात तेच ते ओझे
काळोखाच्या भिंतीवरती
डोकच ते आपटन
गोवून घेतले नात्यात
स्व:ताला ते लिपटन
जुने झालेले फोटो जसे
पिगंटून जाते जसे
स्नेहाचे न दिवस हरपता
उमेदिचे दिवस कसे
कन्हत कन्हत सारे
जीवन सर्व काटले
भावना मनाच्या कुपीत ठेऊन
संसारात जीवन थाटले
मखमली गादीवर
तुझी घुसमट माहित तुलाच
तू विझली काय बुजली काय?
तुझ्या व्यथांची बेरीच तुलाच
वरवरचे ऐश्वर्य तुझे ते
कुजबुजते मनात भावना
संगमरवरी मूर्ती प्रमाणे
दाबतच जातेस आपल्या कामना
सोड तू बंदिस्त घुसमट
तोड ऐकदा पिंजरा
तुझेच जिवन सुदंर व्हावे
रे जिवंत पाखरा
