संवाद
संवाद

1 min

11.6K
तू साधलास संवाद अन्
सुरु झाला ..प्रीत संवाद
वीण नात्याची होण्या पक्की
निरंतर पाझरत होता संवाद.
नातं बांधायला पवित्र बंधनात
पुन्हा झाला पुल मनांचा संवाद
रथ संसाराचा हाकता हाकता
सुरू झाला जबाबदारीचा संवाद
शब्द भांडला शब्दांशी आपला
तेव्हा झाला जरासा मुका संवाद
चिंब पावसाळी कोसळला कधी
कोरडेपणात फसला सुका संवाद..
कधी लांबला तर जरासा थांबावाच
सूर बिघडण्याआधीच....तारसंवाद
वेळ द्यावा संवादालाही कधी जरासा
मौनात मनाशी मग साधू या...संवाद