सण पहा बळीराजाचा ( कविता )
सण पहा बळीराजाचा ( कविता )
1 min
123
सडा सारवण करा भारी
झुल सर्जा राज्याच्या पाठी
रांगोळी काढा सुरेख दारी
खांदे मळणी कालच झाली
गोड धोड करा आता घरी
अंघोळ घालुन शिंगे ती रंगवली
दारा लावा ग चला तोरणं
जोडी दया खाया रोडगं वैरण
सजवा जोडीला आज
औक्षण करा, करा आरास
राब राबुन रात दिन
शेत पिकवलं जसं सोनं
आनंद आज पहा किती
सुखं दारात सारी येती
पोळा हा वर्षाचा आला
सण पहा बळीराजाचा