संकटांशी सामना
संकटांशी सामना

1 min

147
काव्यप्रकार अष्टाक्षरी
घोंघावती संकटांची
मालिकाच लागोपाठ
संकटांना बांध घाला
भंग हो जीवनवाट (1)
सागराच्या वादळांनी
तांडवचि आरंभिले
खवळूनी सागराने
प्रांत उद्ध्वस्तचि केले (2)
रोग विषाणूचा आला
महामारी बळावली
स्पर्श फैलावे तयाला
लाखो माणसे गिळली (3)
श्रेष्ठ निसर्ग नित्यचि
मनू हतबल झाला
शोध लसीचा न लागे
रोज आकडा वाढला (4)
आता प्रयत्नांची शर्थ
नको व्यर्थ गलबला
हटवूनी कोरोनाला
संकटांना बांध घाला (5)