श्रावण सांगता
श्रावण सांगता
1 min
457
केळीचे खुंट
घरोघरी दिसले
वातावरण मंगलमय
व्रतवैकल्यांनी झाले
निसर्गसौंदर्याने मन
गेले भुलून
मृद्गंधाने टाकले
वातावरण मोहवून
आला आला
म्हणेपर्यंत श्रावण
वेळ झाली
जाण्याची पण
थांग पत्ता
नाही लागला
आख्खा महिना
कसा संपला
आता वेध
गणपती-गौरीचे मनी
श्रावणाला निरोप
पुनरागमनाचा देऊनी