STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

शकोत्तर तेजस्वी पुरुष

शकोत्तर तेजस्वी पुरुष

1 min
11.6K

भारतमातेला स्वातंत्र्याचे, रम्य स्वप्न पडले

नाशिक जिल्हा भुगुर गावी, पुत्ररत्न जन्मले  (1)


विलक्षण बुद्धिमत्तेने, प्राविण्य शिक्षणात

देश पारतंत्र्यात, मन तळमळे बेचैनीत  (2)


विलासी जीवन सोडूनी, उडी स्वातंत्र्यसमरात

स्वातंत्र्याच्या अतीव ध्यासे, प्रपंचावर तुळशीपत्र  (3)


एकच तारा समोर आणि, पायतळी अंगार

ध्येयवेडे, देशप्रेमी, सावरकर सागरपार   (4)


अतीव यातना सोसूनी, इंग्रजांस ना नमले

स्वातंत्र्याच्या ध्यासापासूनी,

अलग ना जाहले  (5)


अंधश्रद्धा नको मनी, विज्ञान

प्रमाण माना

लोकोत्तरआदर्श ठेवूनी, सावरकर अमलात आणा (6)


खेचाखेची खुर्चीसाठी, गढूळ, उलटसुलट टीका  

सत्ताधीश हपापलेले, सावरकर अमलात आणा   (7)


युवापिढीने सदा जाणावी, ध्येयनिष्ठा, देशनिष्ठा

कार्य सुवर्णाक्षरांनी लिहा, सावरकर अमलात आणा (8)


शतकोत्तर तेजस्वी पुरुष, सावरकर वंदनीय माना

आचार, विचारांमधे सदा, सावरकर अमलात आणा (9)


Rate this content
Log in