शिकवण
शिकवण
1 min
540
कोरोनाने आज
दिली आहे शिकवण
घराला आज आले
नव्याने घरपण
एकत्र कुटुंब आज
जेवायला बसलं
दृश्य बघून गोड
घर खुदकन हसलं
गोष्ट एकीच्या बळाची
शाळेत होती शिकली
आज मला खरोखर
मनापासून पटली
वेळ दिला आज
साऱ्यांनी एकमेकांना
बंदिस्त सारेजण तरी
उधाण आलं सुखाला
