शीर्षक व्यथा माझ्या बापाची
शीर्षक व्यथा माझ्या बापाची

1 min

217
शेतकरी माझा बाप
राब राब राबतुया
उन्हातान्हातून जातं
नांगरणी करतुया (1)
निढळाचा घाम गाळी
तेव्हा बी पेरले जाई
पावसाने हूल देता
मन धसकून जाई (2)
पोराबाळांसाठी आहे
तोच आमचा पोशिंदा
मायसाठी सर्वस्वचि
धनी तो जन्मोजन्मीचा (3)
कधी ओला कधी सुका
दुष्काळच पाचवीला
कर्ज फेडायचे कसे?
चिंता जाळते उराला (4)
आम्ही सारे मदतीला
नको गड्यांची मिजास
सोनं पिकवू भूमीत
देतो बापाला विश्वास (5)