STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक सुखी संसार

शीर्षक सुखी संसार

1 min
154

अरे संसार संसार

दोन जीव एकजीव

अद्वैतात मीलनाचे

सुख होई जीवशिव   (1)


सुख लागे जवापाडे

नवी नवलाई सरे

झळ संसाराची लागे

त्यागातही मोद कळे   (2)


तडजोड करण्यात

संसाराचे असे यश

सुखदुःख एकजीव

साथ देई मनोमन    (3)


सारे कुटुंब सुखात

ठेवी कुशल गृहिणी

यशस्विनी तीच होय

कधी नाही उणी दुणी  (4)


गोड फुले उमलती

संसाराच्या वेलीवरी

हलकेच उमलवी

मंद वारा जलावरी  (5)


माया प्रेम शिंपूनीया

फुले संसार प्रेमाचा

आनंदाचे सारे क्षण

होई संसार सौख्याचा  (6)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract