STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक सुगंधी शब्दफुले

शीर्षक सुगंधी शब्दफुले

1 min
24

अचानक प्रतिभेने

यावे मनी उसळावे

उधळावी शब्दफुले

गुंफ ना कवितेमधे    (1)


रुंजी घालती मनात

शब्द हे वेगवेगळे 

लयबद्ध रचनेसी

संख्येमधी ते आगळे   (2)


शब्दफुले गुंफताना

मन ठेवी सावधान  

कधी अष्टाक्षरी तर

कधी षडाक्षरी छान    (3)


वृत्तबद्ध गीतांमधे

भाव हळूवार असे

शब्द फुलांची गुंफण

अंतर्मनातूनी स्फूरे    (4)


शब्द फुलांची गुंफण

अर्थवाही जमताना

मन्मनास हो आनंद

काव्यपुष्प खुलताना   (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन