शीर्षक संस्कार मातेचे
शीर्षक संस्कार मातेचे
1 min
64
प्रेमळ माऊली
बाळा जन्म देई
जपे जीवेभावे
ममता लाघवी (1)
खेळताना बाळ
पाही संतोषाने
आनंदे शिकवी
चालणे बोलणे (2)
गोष्टी संस्काराच्या
रंगवून सांगे
मर्म बाळामनी
सहज रुजवे (3)
कडक शिस्तीचे
लावते वळण
संस्कारांनी करे
जडणघडण (4)
अनमोल तिचे
संस्कार असती
बाळ नित्य चाले
सन्मार्गावरती (5)
जीवनसागरी
माय दीपस्तंभ
दिशा दे बाळास
मार्गास सुलभ (6)
