STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक पुण्याची गणना

शीर्षक पुण्याची गणना

1 min
19

सुसंस्कृत घर मिळालेले......

सुदृढ तन मन लाभलेले......

आई वडील प्रेमानं भिजवणारे..

आजी आजोबांचे छत्र सुखावणारे......

ह्यासाठी अनंत जन्मांची पुण्याई लागते

सुरळीत शिक्षण नोकरी स्थिरस्थावर....

गोडगोजि-या मुलांचा वावर...

नातेवाईकांची विचारपूस आधार....

मित्रमंडळींची उठबस सहली गप्पाविनोद.....

अडचणीतही धावून केलेली मदत......

हे सर्व लाभायला लागते अनंत जन्माची पुण्याई....

काहीजण कलाशिक्षणात अग्रेसर....

हात फिरे वाद्यावर सरसर

प्रगती इतकी की अचंबित गुरुही....

" काही लोक वरुनच काही घेऊन येतात "इती.

त्यांचा वादनकलेचा आलेख

शैशवातच पूर्णत्वाला जाई....


ह्यासाठी लागते अनंत जन्माची पुण्याई.

तळमळीने शिकवणारा गुरु लाभणे....

कळकळीने शिकवताना अचूकतेची आस धरणे....

वेळप्रसंगी सडेतोड बोलणे...

हातचे न राखता शिकवणे...

असा गुरु लाभायला लागते..

अनंत जन्माची पुण्याई.

अशी पुण्याई लाभलेले संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम....

जनाबाई , संत नामदेव , संत एकनाथ.....

मानवी देह धारण करुन.....

जनतोद्धाराचे महान कार्य केले.........

कार्याने जगती अमरपण लाभले....

असीम उंची गाठणे खरोखरीच अवघड असते.......

ह्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते .

हरिमुखे बोला , पुण्यकर्म करा

पुण्याची गणना चित्रगुप्त करी.


Rate this content
Log in