शीर्षक निष्पाप बालके
शीर्षक निष्पाप बालके
1 min
32
जन्मदाते जन्म देऊनही
पालकत्व कसे नाकारती!!
काय दोष ह्या चिमुकल्यांचा
थोडे जगूया अनाथांसाठी (१)
सर्वांसवे रहाती मिसळूनी
अनाथाश्रम घर जाणूनी
मावशींना आई समजोनी
बालपण जाय करपूनी (२)
खंत कुणाची लेकरासाठी
अनाथाश्रमात धाव घेती
चिमण्यांना आपले मानोनी
मायबापाचे छत्र धरती (३)
कर्तव्य आपल्या सकलांचे
छाया त्यांच्यावर धरण्याचे
सुखविती बोल अजाणते
निर्मळ हास्य फुले भेटीचे (४)
जन्म देणे विधात्याच्या हाती
आपल्या हाती हो सावरणे
अवचित भेटीचा आनंद
मुखावरी त्यांच्या फुलविणे (५)
