Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक किती रंगला खेळ

शीर्षक किती रंगला खेळ

1 min
237

इथेच आणि ह्या पुनवडीमधी

   घडली आपुली भेट

सख्या रे किती रंगला खेळ //धृ//

किती गोत असे सभोती

वडीलधारे अनेक असती

त्या सा-यांच्या सत्वपरीक्षेमधी

   उजळून आले प्रेम

सख्या रे किती रंगला खेळ //१

मी होते किती अजाण तेव्हा परि सुजाण झाले केव्हा

संसाराच्या रम्य रथामधी

  आधारे तव प्रेम

सख्या रे किती रंगला खेळ//२

नणंदा दीर अन् जावांमधी मी

कष्ट आनंदे झेलले कसे मी

तव दृष्टीची साथ मला ती

   वसे दृष्टीतच प्रेम

सख्या रे किती रंगला खेळ//३

किती पाहिले रम्य जीवन

गोकुळ निर्मिले हर्षे आपण

ह्या गोकुळी रमलो आजि

  ५१ वर्षांचा मेळ

सख्या रे किती रंगला खेळ//४Rate this content
Log in