Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक असे वाग रे मानवा

शीर्षक असे वाग रे मानवा

1 min
40

नको लोभ संपदेचा / नको रुक्ष कटू वाचा

नको त्याग कर्तव्याचा / स्वार्थाचियासाठी रे  (1)

नको दंभ पांडित्याचा / नको गर्व शिक्षणाचा / 

नको बाजार ज्ञानाचा / चांगल्याचसाठी रे (2)

नको तोडू नाती अशी / नको तोडू मैत्री अशी /

रेशीमबंधने अशी / जोडण्याचसाठी रे  (3)

द्यावे धन सहाय्यासी / द्यावे धन गरीबांसी /

द्यावे अन्न भुकेल्यांसी / पुण्यप्राप्तीसाठी रे   (4)

द्यावे सदा विद्यादाना / दक्ष अभ्यासूजनांना /

प्रिय विद्यार्थीजनांना / सर्वश्रेष्ठ दान रे  (5)

द्यावे लक्ष घेई हमी / नका धाडू वृद्धाश्रमी /

सेवा जाणा अंतर्यामी / कृतज्ञतेसाठी रे  (6)

मोकळेचि आलो जसे / मोकळेचि जाऊ तसे /

मनी हव्यासचि कसे / सारे मृगजळ रे  (7)

Rate this content
Log in