शीर्षक आल्या आल्या गौराई
शीर्षक आल्या आल्या गौराई

1 min

118
फू बाई फू फुगडी फू
गौरींसंगे खेळू फुगडी फू //धृ//
आज आल्या घरी गौरी
माहेरवाशणी भारी
खेळायला माझ्यासंगे फुगडी फू
भाग्याच्या गं गौरीबाई
आल्या सोनपावलांनी
ओटी भरुया गं त्यांची फुगडी फू
खेळू हाती हात घेई
फुगडीला जोर बाई
झिम्मा नाच सवे गाणी फुगडी फू
रात जागवूनी गौरी
दमे बाई माझी भारी
गोडधोड खाऊ घालू फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
गौरीसंगे खेळू फुगडी फू