शेकोटी
शेकोटी
1 min
602
पेटली शेकोटी
ज्वाळा भडकल्या
नभास गवसणी घालू लागल्या
थंडीच्या लहरी
हळू हळू
शेपूट घालून पळू लागल्या
अवती भवतीच्या
बाया साऱ्या
शेकोटी पाशी धावून आल्या
काय सांगू थंडी
म्हणजे काय
कळण्या आधीच निघून गेली
तेवढ्यात तो
हळू हळू वर आला
आणि दिवस सुरू झाला.....!
