शब्दगुंफण हायकू
शब्दगुंफण हायकू
1 min
402
येता शिशिर
ते निष्पर्ण वृक्ष
उदास रुक्ष
ओसाड रानी
पळस बहरला
मनी हसला
फुले केशरी
बहरली आनंदे
मुक्त स्वच्छंदे
येता वसंत
ऋतू बहरण्याचा
धुंद मनाचा
शांत वाहती
झुळझुळते वारे
प्रेम शहारे
