STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

शब्द

शब्द

1 min
13.5K


शब्दच असतात अक्षरांचा गुच्छ अखंड दरवळणारा 

मनाला उभारी देणारा , उल्हसित करणारा ...

शब्द्च असतात आश्वासक मैत्रीची हाक

शब्दच असतात जीवाला जीव देणारी साद 

शब्द असतात एक शास्त्र काटेकोर पाळावेच लागते

आपापल्या पातळीवर सिद्धान्तावरून निष्कर्ष निघतात

शब्द जपून वापरावे लागतात नसता बनते घातक शस्त्र 

शब्दच घडवतात इतिहास तस बिघडवतात सुद्धा ...

शब्दच शब्दच पेटवू शकतात घरे - दारे , माणसं सुद्धा ....

शब्दच घडवतात माणसं तशी बिघडवतातहि हमखास   

शब्द असते एक दुधारी तलवार....ती जपून वापरावी लागते 

कधी म्यान करावी , कधी काढावी हेही ठरलेले असत ...

शब्दच लिहतात वीर पुरुषांची गौरवगाथा सुवर्ण अक्षरात 

तेच जिवंत ठेवतात मन - मनात इतिहासाची सोनेरी पर्व 

शब्दच दडवतात कधी- कधी जटील, गूढ , गहन , प्रश्न

साधू संतांनीही सांगितलं शब्दाचं माहात्म्य... 


Rate this content
Log in