शब्द
शब्द


शब्दांची पण काय जादू असते नाही...
यमक जुळवलं तर कविता बनते...
मनातलं मांडलं तर कहाणी होते...
तालात म्हटले तर गाणी बनतात...
मनापासून निघाले तर गोड वाणी म्हणतात...
द्वेषाने म्हटले तर राग म्हणतात...
प्रेमाने बोलले तर आपलेपणा म्हणतात...
चुकलो कधी तर हेच शब्द माफी बनतात,
अनामिक जर कानी पडले तर मनात रुजून बसतात...
हेच शब्द नात्यांना जवळ आणतात...
आणि हेच शब्द दोन घरांना वेगळे करतात...
सगळे म्हणतात की शब्द हे शस्त्रासारखे असतात...
जपून, विचार करून वापरा कारण प्रत्येकवेळी ते मनासारखे नसतात...