सडक ( सहाक्षरी )
सडक ( सहाक्षरी )
1 min
23.5K
प्रगतीसाठी हा
बांधी महामार्ग
व्यापारासाठी हा
भासतोय स्वर्ग
गजबज सारी
वाटतेय शांत
वर्दळ कोठे ती
बसली निवांत
एक विषाणूने
जग थोपविले
धावत्या चाकांना
असे थांबविले
थोडा तरी वेळ
स्वतःसाठी दयावा
सडक शांतता
आता अनुभवा