सावरता आलं तर..
सावरता आलं तर..


हो! आता मला भीती वाटते
मैत्रीची...
प्रेमात पडलो तर?
आता मला भीती वाटते
प्रेमाची...
फसवलो गेलो तर?
आता मला भीती वाटते
माझ्याच शब्दांची...
कुणाला लागले तर?
आता मला भीती वाटते
स्वप्नं पाहायची...
पूर्ण नाही झाली तर?
आता मला भीती वाटते
ओळखीच्याही रस्त्याची...
वाट चुकलो तर?
आता मला भीती वाटते
नव्या नात्यांची...
बिघडली तर?
आता मला भीती वाटते माझीच...
स्वतःपासून हरवलो तर?
हल्ली बरा वाटतो एकटेपणा
तेवढेच जरा स्वतःला...
सावरता आलं तर?