Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manjusha Galatage

Others

4  

Manjusha Galatage

Others

सांज सावल्या

सांज सावल्या

1 min
210

ती संध्या मज नेई दूरदेशी ,

करी हितगुज त्या बेधुंद प्रतिमेशी.

उनाड वारा संध्येचा, सोबती या प्रवासाचा,

स्वच्छंद असे वागणे अन् वर्षाव स्वैर भावनांचा .

गर्द केशरी सांंज सावल्या,

मनाच्या तळ्यावर हलकेच उतरल्या.

उघडून अंतरीची बंद कवाडे ,

सावल्यांसवेे मुक्त वाहल्या.

कल्लोळ हृदयीचा आतून उसळे ,

पापणीतले जळ उचंबळे .

स्मृतीतीरावर हळूच अडखळे ,

मना भावती हे संध्या सोहळे .

मन कातर कातर कातरवेळी ,

माजवी खळबळ प्रत्येक पळी .

सांजकिरणे ही संधी प्रकाशाची,

पसरवती मनावर ऊब क्षितिजाची .

निवांत , सुंदर , प्रसन्न , कोमल ,

ऊबदायी ह्या तरीही शीतल .

मनामनांना व्यापून उरल्या ,

संध्येेच्या या सांज सावल्या ...

Rate this content
Log in