STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Others

सांग कोरोना तु कधी जाणार बाई...

सांग कोरोना तु कधी जाणार बाई...

1 min
51

अतिथी देवो भव असे म्हणतात...

पण तु अतिथी नाहीस 

घुसघोरी करून तू आलीस 

आणि उग्गीच ठाण मारून बसलीस 

पोखरलस तु आम्हाला आमच्या घरात 

निष्पाप बळी चे भक्षण तु आहे करत 

असह्य झालं तुच हे वागणं ‌

कंटाळले तुला आता सगळेच जण 

सांग कोरोना तु कधी जाणार बाई


तुझ्या भिती पोटी लाॅकडाउन‌ झालो 

चार भिंतीत आम्ही अडकलो 

आहेत त्यात पोटाची भूक भागवली 

पुढच्या भविष्याच्या प्रश्नानी रात्र जागवली

कित्येक करत आहे वर्क फ्रॉम होम 

कित्येकाच्या नशीबी नो वर्क

 पोटापाण्याची तु मोठी समस्या निर्माण केली

अशी कशी तु निर्दयी कोरोना बाई 


कधी नव्हते ते मास्क घालून लागलो आम्ही

सॅनिटायझर बाटल्या विकत घेतल्या तुच्यासाठी 

आरोग्याशी आमच्या खेळ आहे तुचा चालू 

खूप झालं तूच पाणी लागलं डोक्यावरून वाहू 

नाही गाठी भेटी नाही कसला उत्सव 

का जगायचं आम्ही तुच्या तालावर 

कित्येक महिने असह्य केलंस आमचं जीवन 

सांग कोरोना तू कधी जाणार बाई 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy