STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

0.2  

Dinesh Kamble

Others

सागरीकिनारा.

सागरीकिनारा.

1 min
514


ओला सागरकिनारा

ओले शंख नी शिंपले..

सांगे एकमेकां तेही

किस्से भेटीचे आपुले..


लाटा परतूनी जाती

जेंव्हा येई ती ओहोटी..

ओल्या सागरकिनारी

मांडू आपुली राहूटी..


प्रेम करू दोघे जण

जसे सागरी उधाण..

आलिंगन एकमेका

दोघे राहू आनंदान..


खोल डोहात शिरू या

जशी सुरमई शान..

लुटू सागराची मौज

जलक्रीडा ग हौसेन..


Rate this content
Log in