STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

रविवार...!

रविवार...!

1 min
704


रविवार....!


र स्ता खराब म्हणून तुडवणे थांबत नाही

वि चार बुरसटलेले म्हणून विचार

करणे थांबत नाही

वा ट वेडी वाकडी म्हणून चालणे थांबत नाही

र डके जीवन असले तरी जगणे थांबत नाही


या जगण्यास अर्थ नसला तरी

जीवन संपत नाही

जगण्यातील उर्मी कधीच कमी होत नाही

हरण्याची भीती कधीच वाटत नाही

म्हणून तर वार कोणताही असो

लढणे कधीच संपत नाही


अपयशाला तुडवणे मी कधीच सोडत नाही

यशासाठी कधीच मी कर्म करीत नाही

यश म्हणून तर मला कधीच सोडत नाही

हारणे कधीच मी स्वीकारत नाही

यशाने कधीच मी हुरळून जात नाही

अपयशाने मी कधी खचत नाही


प्रयत्नात मी कधी कमी पडत नाही

प्रयत्नांती परमेश्वर हे काही खोटे नाही

यश कोणतेही कधी छोटे नाही

अपयश कोणतेही कधी मोठे नाही

दुःख कधी ही खरे नाही

सुख कधी ही खोटे नाही


ज्याने हे जाणले त्याचे दुर्भाग्यही सौभाग्य होते

अंधाऱ्या वाटेवरी काजवाही वाटेकरी होतो

सहजी तो यशास गवसणी घालण्याचे बळ देतो

तेंव्हा ध्येयाचा फिनिक्स आकाशी झेप घेतो...!


Rate this content
Log in