Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

रूपवती (निसर्ग)

रूपवती (निसर्ग)

1 min
208


धुंद धुक्याची पहाट....

कोणी अशी आच्छादली,

माथ्यावर डोंगराच्या 

श्वेत शाल मखमली !


दरी खोऱ्यांतून वाहे....

अखंडित हा गारवा, 

निसर्गाचा अविरत

छेडी कोण तो मारवा !


शुभ्रवर्णी धबधबा.....

फेसाळतो कोसळून,

खडकांच्या कपारीत

जल मोती ओसंडून !


हिरवळ चहूकडे....

बहरली फुले,पाने,

किलबिल पक्षांचीही 

हळूवार गाई गाणे !


दुरवर पसरली.....

छटा ही रंगीबेरंगी,

चित्र भासे अप्रतिम 

निसर्गाचे रे अत्रंगी !


कोठे हिम विराजतो.....

कोठे धारा वर्षावती,

सृष्टी अवघी नटली

आविष्कारी रूपवती !


Rate this content
Log in