STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

5.0  

Prachi Kulkarni

Others

रोजच्यासारखे रोज

रोजच्यासारखे रोज

1 min
1.1K


रोजच्यासारखे जगणे आणि रोजच्यासारखे वागणे

मोजून मापून हसणे नि तोलून मापून बोलणे


सरळसोट वाट आमची, वळणे नाहीच माहित

संध्याकाळहि हळूच जाई , बसची वाट पाहित


थ्रिल कशास अनुभवावे , उगाच वैतागवाडी

प्रवासामध्येहि कशास पहावे , ते रस्ते अन् ती झाडी


चाकोरीतील आठवडा अन् सुटीचीही तीच तऱ्हा गिरवलेला शृंगार आणि कंटाळयाचा कऱ्हा


ठरविलेले आयुष्य आणि ठरलेले मुक्काम पोस्ट

आरंभापासून अखेरपर्यंत , एवढीच आमची गोष्ट..


Rate this content
Log in