रोजचीच ती सांजवेळ
रोजचीच ती सांजवेळ

1 min

42
रोजचीच ती सांजवेळ केशरी रंगात न्हाऊन येते
नको म्हंटल तरी कातरवेळ सजून येते
हुरहूर मनात दाटून आठवणींचा हुंदका घेऊन येते
मनाच्या डोहात उतरून डोळ्यांच्या काठी भरून येते
रोजचीच ती सांजवेळ केशरी रंगात न्हाऊन येते
ऊन्ह सावली पाठशिवणीचा खेळ खेळून
किनाऱ्याशी सलगी करू पाहते
दिपज्योतिच्या प्रकाशात रंगून
मनीचे मळभ दूर सारून उमेदीचा रंग लेऊन जाते
रोजचीच ती सांजवेळ केशरी रंगात न्हाऊन येते