रंगरंगीली दुनिया
रंगरंगीली दुनिया
1 min
404
आयुष्याचा कँनव्हास
रंग विविध रेखावे
देतो निसर्ग कुंचला
रंग तयाने भरावे
रंग केशरी बाल्याचा
अवखळ खळखळ
खेळ खाऊ गप्पागोष्टी
मिळे आनंद निखळ
रंग गुलाबी यौवन
जडे प्रेम कुणावरी
आणाभाका नि वचने
जीव जडे उराउरी
पीत रंग मध्यमात
गाडी स्थिरावे थोडीशी
लग्न संसारात मग्न
नसे उसंत जीवासी
निवृत्तीचे वळणास
गाडी लागता मनासी
जुने बंध सोडताना
नकळत ये उदासी
येता कांचनसंध्येत
राग लोभ जाती दूर
रंग शुभ्र पैलतीर
मनी आठवांचे पूर
रंग जीवनाचे असे
पालवती सुरांपरि
सुखी आनंदी रहावे
मर्म जाणावे अंतरी