STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

पुन्हा रक्ताळलेल्या पायांनी...

पुन्हा रक्ताळलेल्या पायांनी...

1 min
14.5K


नटून- थटून नववधू वराची वाट पाहते अगदी तशी...

वसुंधराही आसुसली होतीच भेटण्यास वरुणराजा

तो ही आलाच रांगडा प्रियकर बनून बेभान होऊन ...

निरभ्र आकाशात अचानक ढंगाचे पुंजके , सुसाट वारा


वसुंधरा आवरून - सावरून तो येण्याची वाट पाहते ...

तो ही येतोच वेळीअवेळी आश्वासक ...तारणहार होऊन

तिला माहित्येय वरुणराजा बरसणार , तृष्णा भागविणार

आकाश केवळ आभासी क्षितिज , वरुणराजा स्वछंदी प्रियकर


निरभ्र आकाशात अचानक ढगांचे पुंजके जमा होतात नी ...

वरुणराजा येतो वसुंधरेस भेटण्यास जशी ओढ भ्रमराची फुलास

वसुंधराही उत्सुक असतेच प्रजननास नि वंशवृद्धी करण्यास

वरुणराजाही सिद्ध होतो मग तिची कूस उजविण्यास ...


अंकुरते मग धान ते सुंदर.. मनमोहक ..आशादायी

हिरवे स्वप्न उरी दाटते ... हरकतो तो बळीराजा ...

काळ्या आईची ओटी भरून उद्याच्या सुखस्वप्नांना पेरतो ...

पुन्हा रक्ताळलेल्या पायांनी... फाटक्या संसाराचा गाडा ओढतो


Rate this content
Log in