पर्यावरण
पर्यावरण


खोड फुले पाने
हिरवीगार भरगच्च राने
भरभरून तुज देई
रानमेवा तू खाई
चराचरांची मांदियाळी
पशु-पक्ष्यांची खेळीमेळी
पर्यावरणाचा ऱ्हास
मानवा आता बास
जागा हो उठ मानवा
आठव ती स्वच्छ हवा
तुझ्याच हाती पर्यावरणाची डोर
म्हणती नद्या नाले मनावर कोर