परिचय- एक प्रयोगशाळा
परिचय- एक प्रयोगशाळा


देह म्हणजे प्रयोगशाळा !
डोळे जसे लिटमस पेपर
माणसाची नजर जशी
चंचूमधलं सोल्यूशन !
माणसाचा परिचय म्हणजे
चांगल्या वाईट गुणांचं रसायन ! १!
सत्यवृत्तीची तपासणी करता
क्षणात होते परीक्षण !
रिपोर्ट सारे नॉर्मल दिसतात !
बघून उघड्या डोळ्यानं !
माणसाचा परिचय म्हणजे
चांगल्या वाईट गुणांचं रसायन ! २!
निदान वाईट वृत्तीच
होत नाही तेव्हढं पटकन !
काही दिवसाच्या चाचण्यात दिसते!
हे कीड पसरवणारे लक्षण !
माणसाचा परिचय म्हणजे
चांगल्या वाईट गुणांचं रसायन ! ३!