प्रेम म्हणजे????
प्रेम म्हणजे????
1 min
314
साद प्रेमाची,
तुझ्या माझ्या प्रीतीची,
उत्कटतेची।।
याद मिठीची,
अलवार प्रेमाची,
गच्च दिठीची।।
उत्कट तन,
भावविभोर मन,
धुंदी प्रेमाची।।
आतुर काया,
प्रेमाची मोहमाया,
श्वासाश्वासात।।
देहा चुंबुन,
अधरा आलिंगन
प्रेमा प्रेमात।।
सुनिता अनभुले, मुंबई