प्रभात
प्रभात
1 min
551
प्रभात वेळी
सुमने उमलती
भ्रमर गाती.
कुक्कुट सांगे
ओरडून जगाला
भास्कर आला.
गोठ्यात धेनु
पिलांसाठी हंबरे
पान्हा पाझरे.
पक्षी करिती
गोड चिवचिवाट
किलबिलाट.
घडा घेऊनि
स्त्रिया भरती पाणी
सडा अंगणी.
मंदिरी शांत
भूपाळी घालते साद
घंटेचा नाद.
सरली रात्र
अरुणोदय झाला
लागा कार्याला.
