प्राणज्योत ( अभंग रचना )
प्राणज्योत ( अभंग रचना )
आईची मुलगी | खूप ती शिकली ॥
तीला पाठवली I परदेशी ॥ १ ॥
राही एकटीच । आई ती बिचारी ॥
लेकीस विचारी | फोन करी ॥ २ ॥
वाढला दूरावा I संवाद संपला ॥
नाळेचा तुटला I हा ओलावा ॥ ३ ॥
शेजारी सांगती | आई आता गेली ॥
काय चूक झाली ? I सांग तरी ॥ ४ ॥
तुम्हीच उरका I पुढील कार्य ते ॥
प्रश्न का भलते | विचारता ? ॥ ५ ॥
असा एक लेक I विदेशी गेलेला ॥
तेथे स्थिरावला | कायमचा ॥ ६ ॥
आई राहतसे | त्या इमारतीत ॥
ऊंच मजल्यात I एकटीच ॥ ७ ॥
कोणा ना लागला | थांगपत्ता काही ॥
देह तरी पाही | दाराकडे ॥ ८ ॥
वर्षभराने तो | मुलगा हो आला ॥
सांगाडा पाहिला | सोफ्यावर ॥ ९ ॥
प्राणज्योत अशा | किती मालावल्या |
वांझोट्या ठरल्या I समाजात ॥ १० ॥
