पंढरीची वारी
पंढरीची वारी

1 min

284
पाऊले चालती
पंढरीच्या दारी
आषाढी कार्तिकेचा
महिमा आहे भारी॥१॥
पंढरीचा महिमा
वर्णावा किती
दिंड्या, पताका
वैष्णव नाचती ॥२॥
डोईवर तुळस
माता भगिनी घेती
हरिनामाचा जयघोष
वारकरी करती ॥३॥
डोईवर हिरवीगार तुळस
मुखी विठ्ठलाचा गजर
विठ्ठला भेटण्या वारकरी
करिती जागर ॥४॥
पायी वारी केली
तुझ्यासाठी हरी
देउन दर्शन
कृपा कर माझ्यावरी ॥५॥
ऊन पावसाची
नाही केली चिंता
किमया तुझी सारी
नतमस्तक तुझ्या मी दारी॥६॥