पहाट
पहाट
1 min
6.7K
रोज उगवे होऊन
सूर्य पहाटे पूर्वेला
नव किरणांचा दव
जसा येथे पसरला
आस देऊन मनाला
जातो सूर्यनारायणा
अंत करूनी रात्रीचा
हाच स्वार्थपरायणा
नव जीवन फुलवे
देई वाट प्रकाशमयी
नव चैतन्य बहारे
दिन हे उल्हासमयी
बहुरंगे ती पेरली
क्षणाक्षणा वाटे नवे
फूल गंधाचा वाराही
जग भासे ते हो नवे
रोज खेळ असा चाले
देई संदेश जगाला
नको घाबरु मानवा
पुन्हा येऊ दे उदयाला.