पहाट...!
पहाट...!
पूर्वी कसं बरं होतं
कुत्रं केकाटायच नाहीतर भुंकायच
कोणीतरी तांब्या घेऊन
जातेल कळायचं
चेक चेक केक केक ऐकू यायचं
एखादी घंटा किंव्हा लोडणं जाणवायचं
हल्ल्या हल्ल्या करीत उगवायच
चुलीवर चहाच आदण चढायचं
तेवढ्यात कोंबड्या बाहेर पडायच्या
विहिरीवर काकण वाजायची
घागरी बुडायच्या आपटायच्या
आणि तोंड वाजायला सुरू व्हायची
गोवऱ्या लाकडाश चुलीत शिरायची
चादर ओढली जायची
थंडीतच सार सार घडायचं
दिवसच उगवू नये वाटायचं
आता पूर्वी सारख काही राहील नाही
डोळ्याला डोळा लागत नाही
पूर्वीच काहीच घाटत नाही
मागमूसही कशाचा लागत नाही
आता पीचीपीची मोबाईल पिचपीचतो
हळूच हात बाहेर येतो स्वाईप करतो
बेल वाजते दूध येऊन पडते
दारावरच पेपर फेकला जातो
वाटत इतकी निरस सकाळ
पाहण्यासाठीच का प्रगती झाली
देव धर्म कोपऱ्यात जाऊन बसला
मोबाईलने सारा आनंदच गिळून टाकला
सारखे मेसेज येतात गुड मॉर्निंगचे
वाटत कसली गुडमॉर्निंग
इथे सारच गणित चुकलंय
बाबांनो खरच सौख्य पोरक झालंय
तरी नाही म्हणायला सकाळी
भल्यापहाटे जेंव्हा जाग येते
तेव्हा न चुकता हाताचे दर्शन होते
कराग्रे लक्ष्मी म्हणता सारे स्पष्ट दिसते....!
